ऑगस्ट क्रांती मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप; तुषार गांधींसह प्रमुख आंदोलक ताब्यात, कडक बंदोबस्त


मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात शनिवारी दुपारी ३:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आला.

मुंबई पोलिसांकडून या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण ग्रँड रोड व ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त, रस्तो रोधक उभारून वाहतूक वळविण्यात आली होती.

आंदोलनाचे केंद्र असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते शनिवारी सकाळीच लोखंडी रस्ता रोधक उभारून पूर्णपणे बंद करण्यात आले. मैदानावर कोणालाही जमू दिले जात नव्हते. सुरक्षेच्या कारणास्तव राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक आणि स्थानिक पोलिसांचे शेकडो अधिकारी – कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी वांद्रे येथील नॅशनल कॉलेज जंक्शन परिसरातून निघाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना सांताक्रूझ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्या गुड्डू एस. एल. यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईत दिवसभरात खबरदारीचा उपाय म्हणून २०० हून अधिक संशयित व आंदोलकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ताब्यात घेण्यात आले. ऑगस्ट क्रांती मैदान आणि ग्रँड रोड परिसरातील ज्युबिली मिल, तेजपाल रोड आणि लगतच्या जोडरस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी आणि पोलिसांनी रस्ता रोधक उभारल्यामुळे या मार्गावरील बेस्ट बसेस आणि खासगी वाहने नजीकच्या लॅमिंग्टन रोड व नाना चौक भागाकडे वळवण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button