
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकेडमध्ये पादचारी पुलाच्या उभारणीला वेग
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळत असतानाच वाकेड येथे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या पादचारी पुलाच्या उभारणीचा कामाला वेग आला आहे. मंगळवारी या पुलावरील दोन मोठे कॉंक्रीट गर्डर अत्याधुनिक क्रेनच्या सहाय्याने खांबांवर अचूकपणे बसविण्यात आले. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने वाकेड परिसरातील नागरिक, विद्यार्थी तसेच पादचार्यांना महामार्ग ओलांडताना निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन या पादचारी पुलाची उभारणी करण्यात येत आहे. पुलामुळे महामार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.




