
समुद्री सापाचा दंश; खलाशी रुग्णालयात
साप चावलेल्या खलाशाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदेश मादू राणजे (४८, रा. कलासरी-वरचापाडा, जि. पालघर) असे समुद्री साप चावलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना ३० सप्टेंबरला सकाळी सहाच्या सुमारास जैतापूर येथे समुद्रात असताना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश राणजे हा बोटीवर मासेमारी करताना त्याला समुद्री सापाने दंश केला. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




