
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणीत चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे भालचंद्र सप्रे यांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांपैकी चार गाळ्यांचे शटर फोडून चोरी केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेनंतर काही संशयित व्यक्तींना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, संशयितांवर ठोस कारवाई न आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. धामणी येथे सप्रे यांच्या मालकीचे मेडिकल, किराणा माल व हार्डवेअरचे दुकान गाळे भाड्याने देण्यात आले आहेत.




