लोटे एमआयडीसीत धक्कादायक प्रकार, उद्योजकाला मागणी विना दिले ४ कोटी ९९ लाखांचे कर्ज ?


लोटे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उद्योजक राजेश तिवारी यांच्या नावावर आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित कागदपत्रांचा गैरवापर करून ४ कोटी ९९ लाख रुपयांचे कॅश क्रेडिट परस्पर कर्ज खाते तयार करून त्यात जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतून हे कर्ज तिवारी बायो फॉस्फेट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर जमा करण्यात आल्याचा दावा उद्योजक राजेश तिवारी यांनी केला आहे. राजेश तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर याबाबत खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारादरम्यान सुमारे १३ लाख रुपयांचे सर्व्हिस चार्जेस डेबिट झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. आपल्या कंपनीच्या नावावर एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज काढण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश तिवारी नी माध्यमांसमोर येत आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button