
दाभोळ पॉवर प्रोजेक्टसाठी दिलेल्या एकूण जमिनी पैकी वापरात नसलेली 200 हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत करा..!अंजनवेल मधील सुमारे तीनशे शेतकऱ्यांची सरकारकडे आग्रही मागणी
1994 रोजी जमीन अधिग्रहण करताना शासनाने शेतकऱ्यांना केवळ 85% मोबदला दिला. उर्वरित 15टक्के फरकाची रक्कम व्याजासहित शेतकऱ्यांना द्यावी अन्यथ:अंजनवेल मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी शासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहेत असा गंभीर इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि अंजनवेल ( बोर भाटले - कातळवाडी ) ग्रामस्थ मंडळाचे सरचिटणीस यशवंत सोनू बाईत यांनी गुहागर तालुक्यातील कातलवाडी - बोरभाटले येथील सहाण येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
सामाजिक कार्यकर्ते यशवंत बाईत पूढे म्हणाले की,वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आरोप असून 610 हेक्टर पैकी उर्वरित 200 हेक्टर जमीन पडून असल्याने शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी करून यशवंत बाईत आक्रमक होऊन म्हणाले की,आमची मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते यशवंत बाईत यांनी गंभीर इशारा दिला आहे.यावेळी यशवंत बाईत,विठ्ठल (बावा) भालेकर, चंद्रशेखर बाईत, सुरेश देवाळे, गंगाराम भुवड आणि अंजनवेल – कातळवाडी, वेलदूर – घरटवाडी व रानवी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.




