दिशा सालियन यांना ना कधी भेटलो, ना ओळखत होतो; आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले!


शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलेलो नाही आणि त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती, असे आज स्पष्ट केले. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाची राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निष्पक्षपणे चौकशी होऊ द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात आज सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही आपले नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं पँपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करून केल्या जाणाऱया टीव्ही चॅनल्सवरच्या खोटय़ा चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करू द्या,’ असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

अशा चारित्र्यहननाच्या आणि खोटय़ा प्रचाराच्या मार्गाने शिवसेनेला शांत बसवू शकतो असे कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरूच राहील.

या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही आपले नाव जोडण्याचा 6 वर्षांपासून हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. हे सततचं खोटं कँपेन दुर्दैवी आहे. टीव्ही चॅनल्सवरच्या खोटय़ा चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button