
पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार यांची ९३ वी जयंती साजरीआर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अभिवादन
रत्नागिरी, दि. २ ): वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत वडार समाजासाठी कार्यरत असलेल्या ‘पै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळा’च्या कार्यालयात पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार यांची ९३ वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पै. कै. मारुती चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करत अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे, अशोक हलहुटकी, रुक्मिणी वडार, सुनील चव्हाण, गणेश पवार यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



