खांदाटपालीचे गणेशमूर्तिकार राजेश वरळकर यांच्या गणेशमूर्ती अमेरिकेत विराजमान होणार


कोकणात प्रसिद्ध असणारा गणेशोत्सव सण जवळ येत असल्याने गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यातील विविध गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मूर्ती घडविण्याची लगबग सुरू असतानाच खांदाट पाली येथील गणेशमूर्तिकार राजेश नरळकर यांनी तयार केलेली गणेशमूर्ती थेट अमेरिकेत विराजमान होणार आहे.
खांदाट पाली येथे अनेक पिढ्यांपासून गणपती बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय नरळकर कुटुंबीयांकडून जपला जात आहे. याच परंपरेचा वारसा पुढे नेत राजेश नरळकर यांनी आपल्या कलेतून अनेक आकर्षक आणि रेखीव (आताची आंब्रे) आपल्या कुटुंबीयांसह सध्या (न्यू जर्सी) अमेरिकेत वास्तव्यास आहेत. कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा अमेरिकेतही जपण्यासाठी त्यांनी गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
खांदाट पाली गावातील माहेरवाशीण सुर्वे यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करून देण्याची विनंती राजेश नरळकर यांच्याकडे केली. विशेष म्हणजे, कमी कालावधीत ही मूर्ती तयार करण्याचे आव्हान नरळकर यांनी स्वीकारले आणि अत्यंत अल्प वेळेत सुबक गणेशमूर्ती साकारली. ही मूर्ती लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button