
राम आळी बाजारपेठ ‘हार्ट ऑफ सिटी’ मध्ये गटार कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला
राम आळी बाजारपेठ ‘हार्ट ऑफ सिटी’ मध्ये गटार कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला*
राम आळी येथील श्री राम मंदिरात भगवान श्रीराम यांच्या दर्शनाने व आशीर्वादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या राम आळी बाजारपेठ परिसराला ‘हार्ट ऑफ सिटी’ म्हणून ओळखले जाते. या महत्त्वाच्या भागातील प्रभाग क्रमांक १५ व प्रभाग क्रमांक ९ मध्ये गटाराच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कामाचा शुभारंभ महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या प्रसंगी रत्नागिरी नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, प्रभागाच्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे व सायली पाटील वैभवी खेडेकर, तसेच नगरसेवक विजय खेडेकर, नितीन जाधव, अमित विलणकर उपस्थित होते. याशिवाय भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, सचिन गांधी, विकास पाटील, राहुल रसाळ, सत्यवती बोरकर, मधुरा ढेकणे, मिलिंद दळी, श्यामा कोंसुबकर व संकेत ढेरे जैन यांनीही उपस्थिती दर्शवली.
राम आळी बाजारपेठ हा शहराचा ‘हार्ट ऑफ सिटी’ मानला जात असल्यामुळे या ठिकाणी होणारे गटार काम अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच चार महिन्यापूर्वी निवडून आलेल्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे गटार काम त्यांच्या निवडून आल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत सुरू करण्यात आले आहे.
या कामामुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून स्वच्छता व पाणी निचरा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
स्थानिक व्यापारी तसेच नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व मान्यवरांचे आभार मानले.




