चिवेली पाणी योजना अपहार; गुन्हे दाखल करण्याचे कोकण विभागीय आयुक्तांचे आदेश


चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत प्रत्यक्ष कामे न करताच सुमारे ३३ लाख रुपयांची देयके अदा करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तत्कालीन ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव तसेच पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. तसेच अपहार झालेल्या रकमेची संबंधितांकडून वसुली करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button