रत्नागिरीच्या गौरी मिलके, विशाल कुबल यांची एशियन मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी; बंगळुरू येथे करणार भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी : हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर रत्नागिरीच्या जलतरणपटू गौरी मिलके आणि विशाल कुबल यांची बंगळुरू येथे होणाऱ्या ‘एशियन मास्टर्स जलतरण स्पर्धे’साठी निवड झाली आहे. या स्पर्धेत दोन्ही खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

राष्ट्रीय स्पर्धेत गौरी मिलके हिने दमदार कामगिरी करत तीन प्रमुख प्रकारांत अव्वल सहामध्ये स्थान मिळवले. तिने ४०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडलेमध्ये चौथे, २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये चौथे, तर २०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडलेमध्ये पाचवे स्थान पटकावले.

विशाल कुबल यानेही खडतर समजल्या जाणाऱ्या ४०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले प्रकारात चौथे स्थान मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी सिद्ध केली.

दोन्ही जलतरणपटूंना प्रशिक्षक महेश मिलके यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्पर्धेतील या कामगिरीच्या जोरावर गौरी मिलके आणि विशाल कुबल आता बंगळुरू येथे होणाऱ्या एशियन मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.

या निवडीबद्दल रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी तसेच जलतरण क्षेत्रातून गौरी मिलके आणि विशाल कुबल यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button