संगमेश्वर येथून गांजा वाहतूक प्रकरणी खेडमध्ये दोघांना अटक


संगमेश्वर येथून गांजा विक्रीसाठी येथे आलेल्या इरफान इद्रिस खान (१९, आंबेड खुर्द मुस्लिम मोहल्ला, संगमेश्वर) मोहम्मद साद माजिद शहा (१८, कसबा दखनी मोहल्ला, संगमेश्वर) या दोघांना येथील पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून १ किलो ७२ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे दोघेजण दुचाकीवरून गांजाची विक्री करण्यासाठी येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस कॉन्स्टेबल बिजेंद्र सातार्डेकर, कृष्णा दराडे, ढगे, सकपाळे यांनी सापळा रचला. भौस्ते जगबुडी नदी पूल ते देवणा पूल यादरम्यान एम.एच.०८/बी. एच.३१११ क्रमांकाच्या दुचाकीने दोघेजण आले असता पोलिसांनी शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button