हॉटेल वेस्ट बे गणपतीपुळे च्या वतीने मालगुंड आरोग्य केंद्राला औषधांचा साठा


मालगुंड : गणपतीपुळे येथील हॉटेल वेस्ट बे यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत हॉटेल व्यवस्थापनाने आरोग्य केंद्राच्या गरजेची दखल घेत हा उपक्रम राबविला.
हॉटेल वेस्ट बेचे ग्रुप जनरल मॅनेजर श्री. संजीव सरकार व श्री. अप्पा पारकर यांनी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे उपस्थित राहून औषधे आरोग्य केंद्राच्या प्रशासनाकडे सुपूर्त केली.
हॉटेलचे मालक श्री. प्रसाद तेंडोलकर कर यांनी यापूर्वीदेखील आरोग्य केंद्रासाठी अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करून आरोग्यसेवेला सहकार्य केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आवश्यक औषधोपचार उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
या औषधांच्या उपलब्धतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषिकेश डोके तसेच आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी विशेष प्रयत्न केले.
हॉटेल वेस्ट बेच्या व्यवस्थापनाने आरोग्य केंद्राला दिलेल्या या सहकार्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. शासकीय आरोग्य व्यवस्थेला उद्योग व सामाजिक संस्थांकडून मिळणारे असे सहकार्य ग्रामीण भागातील रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button