
मराठी अभिनेते श्रीरंग गोडबोले यांना ’राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; १६ रोजी चिपळुणात वितरण
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांची समतावादी संघटना असलेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिलच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना ’राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २०२६-२७ या वर्षासाठी राजकीय क्षेत्रातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना, तर सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते लेखक व दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सास्कृतिक केंद्र येथे दुपारी ४:०० वाजता माजी खासदार हुसेनभाई दलवाई यांच्या व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.


