हाऊसबोट पर्यटन प्रकल्प अधिक सक्षमपणे कार्यान्वित होणारडीआरडीए च्या प्रकल्प संचालकांची माहिती


रत्नागिरी, दि. ३० ) : जिल्ह्यातील महिला बचतगटांना शाश्वत उपजिविका उपलब्ध करून देत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हाऊसबोट पर्यटन प्रकल्प रद्द करण्यात आलेला नसून, तो अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील महिला प्रभागसंघाना शाश्वत उपजीविका निर्माण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी 5 हाऊसबोट मार्फत प्रकल्प सुरु आहेत.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दि. 27 जुलै रोजीच्या सिंधुरत्न समृध्द योजनेच्या बैठकीदरम्यान दिलेल्या निर्देशानसुार हाऊसबोट पर्यटन प्रकल्प अधिक क्षमतेने कार्यरत होण्यासाठी व यातून महिला प्रभागसंघांना अधिक उत्पन्न मिळण्याच्या अनुषंगाने भाट्ये किनाऱ्याजवळ हाऊसबोट टर्मिनल करुन अधिक पर्यटन सुविधा देवून होऊसबोट पर्यटन व्यवसाय अधिक क्षमतेने कार्यरत करता येणार आहे. त्यामुळे हाऊसबोट प्रकल्प रद्द होणार नसून तो अधिक क्षमतेने कार्यरत होणार आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button