खेंड येथील गणपती विसर्जन घाटाची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडून पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधांचा घेतला आढावा

चिपळूण : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेंड येथील गणपती विसर्जन घाटाची चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विसर्जनासाठी करण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

गणेशोत्सव काळात विसर्जन घाटावर सुरक्षितता, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. विसर्जन प्रक्रियेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी नगर परिषद प्रशासनाने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नगराध्यक्ष सकपाळ यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात आरोग्य सभापती शुभम पिसे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, शिवसेना गटनेते अंकुश आवले, स्थानिक नगरसेविका शिल्पा देसाई तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button