
भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांची मुचरी युवा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या राहत्या घरी मुचरी युवा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी यादव यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.
गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वात झालेल्या या भेटीदरम्यान विविध सामाजिक विषयांवर आपुलकीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. तसेच सामाजिक कार्य, गावातील विविध उपक्रम आणि भविष्यातील सामाजिक उपक्रमांबाबतही विचारविनिमय झाला.
यावेळी मुचरी युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विलास वामन सुर्वे, बाळकृष्ण महाडिक, नीलेश भालेकर आणि खंडेश कासार उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे सामाजिक व मैत्रीपूर्ण संबंधांना अधिक बळ मिळाल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.




