सर्वसामान्यांना बाप्पा पावला! ऐन गणेशोत्सवात ST महामंडळाचा NCMC कार्डसंदर्भात मोठा निर्णय


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने म्हणजेच एसटीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. सवलतीच्या प्रवासासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्डसंदर्भतील मुदत पुढे ढकलण्यात आली आहे.या कार्डसाठीची सक्तीची तारीख आता 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून कार्ड नसले तरी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना जुन्या पद्धतीने सवलतीचे तिकीट मिळणार आहे.

अडचणींचा सामना

एनसीएमसी कार्ड काढताना सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांसह वाहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

मॅन्युअल तिकिटावर सवलत

एनसीएमसी कार्ड प्रणालीच्या सर्व्हरवर ताण वाढला आहे. यामुळेच एनसीएमसी कार्ड रिचार्ज न होणे किंवा कार्ड रीड न होण्याच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे सवलतीचे तिकीट कार्डमधून काढता न आल्यास यापूर्वी 14 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र आता ही सवलत अजून दोन आठवड्यांनी वाढवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button