ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 25 सप्टेंबरपूर्वी करा हे छोटंस काम, अन्यथा सस्पेंड होईल लायसेन्स

Driving License : तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स असेल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 25 सप्टेंबरपर्यंत मोबाईल नंबर अपडेट करण्याची मर्यादा ठरवण्यात आली आहे. जर तुमच्या जुन्या लायसेन्समध्ये मोबाईल नंबर नोंदवलेला नसेल किंवा अपडेट नसेल.

तर तो लवकर अपडेट करणं गरजेचं आहे. सरकार आणि परिवहन विभाग वाहन मालकांना ‘सारथी परिवहन’ पोर्टलवर आपली संपर्क माहिती अपडेट ठेवण्याचे सतत आवाहन करत आहेत. योग्य मोबाईल नंबर उपलब्ध असेल तर ई-चलान, रिन्यूअल अलर्ट, OTP आणि इतर महत्त्वाच्या सूचना वेळेवर मिळतात.

अपडेट न केल्यास ऑनलाइन सर्व्हिसवर परिणाम होऊ शकतो आणि ट्रॅफिक तपासणी दरम्यान अडचणही निर्माण होऊ शकते. नवीन लायसेन्समध्ये नंबर सामान्यतः नोंदवला जातो. पण जुन्या डॉक्यूमेंटमध्ये ही कमतरता सामान्य आहे. ही प्रोसेस घरबसल्या ऑनलाइन काही मिनिटांत केली जाऊ शकते. डेडलाइन जवळ असल्याने आता उशीर करू नये. योग्य नंबर लिंक केल्याने भविष्यात लायसेन्ससंबंधित सेवा या नीट चालू राहतील आणि निलंबन सारख्या समस्यांपासून तुम्ही वाचू शकता.

डेडलाइन आणि तिचे महत्त्व

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हिंग लायसन्समध्ये जोडलेला मोबाईल नंबर अपडेट करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर आहे. ही मुदत वाढवली जाण्याची शक्यता असली, तरी तशी जोखीम न पत्करणेच हेच योग्य ठरेल. नंबर अपडेट न केल्यास लायसेन्स सस्पेंड होणे किंवा संबंधित सेवांमध्ये व्यत्यय येणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, नोंदी अचूक राहण्यासाठी ‘वाहन’ आणि ‘सारथी’ पोर्टल्सवर मोबाईल क्रमांक अपडेट करण्याचा सल्लाही परिवहन मंत्रालयाकडून देण्यात आलाय.

मोबाईल नंबर अपडेट का गरजेचं?

जुन्या ड्रायव्हिंग लायसेन्समध्ये अनेकदा मोबाईल नंबर किंवा फोटो अपडेट होत नाहीत. यामुळे ट्रॅफिक पोलिसांच्या तपासात अडचण येऊ शकते. योग्य नंबरने ई-चालानची सूचना, रिन्यूअल रिमाइंडर आणि डिजिटल सेवांचा ओटीपी सहज मिळतो. अॅक्टिव्ह नंबरशिवाय अनेक ऑनलाइन प्रोसेस अपूर्ण राहते. यामुळे योग्य वेळी मोबाईल नंबर अपडेट करणं फायदेशीर ठरतं.

स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

ही प्रोसेस पूर्णपणे मोफत आहे आणि घरबसल्या पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी अधिकृत सारथी परिवहन पोर्टलचा वापर करा. याची पूर्ण स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस जाणून घेऊया…

  • ब्राउझरमध्ये sarathi.parivahan.gov.in ओपन करा किंवा गूगलवर Sarathi Parivahan सर्च करा आणि सरकारी साइड निवडा. आपलं राज्य निवडा.
  • Others किंवा इतर मेन्यूमध्ये जाऊन Mobile Number Update ऑप्शनवर क्लिक करा.
  • ड्रायव्हिंग लायसेन्स नंबर आणि जन्मतारीख सारखी मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
  • स्क्रीनवर दिसणाऱ्या लायसेन्स डिटेल्स लक्षपूर्वक चेक करा.
  • नवीन मोबाईल नंबर नोंदवा आणि पुढे जा.
  • नवीन नंबरवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
  • प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन नोट करा. काही प्रकरणांमध्ये आधारशी संबंधित नंबरने अतिरिक्त व्हेरिफिकेशनही गरजेचं असू शकतं.
  • पूर्ण काम हे फक्त काही मिनिटांत होईल. काही डॉक्यूमेंट अपलोड करणे किवा आरटीओला जाण्याची गरज पडणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button