जागतिक वारसा लाभलेल्या माथेरान मिनी ट्रेन लवकरच हायड्रोजन इंजिनवर


जागतिक वारसा लाभलेल्या माथेरान मिनी ट्रेनला लवकरच हायड्रोजन इंजिनाची जोड मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या हायड्रोजन फॉर हेरिटेज उपक्रमांतर्गत नेरळमाथेरान हिल रेल्वेचा समावेश करण्यात आला असून, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक रेल्वेसेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. ऐतिहासिक वारसा जपत स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याच्या उद्देशाने देशातील निवडक हेरिटेज रेल्वेमार्गांवर हायड्रोजन इंजिन सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यामध्ये नेरळमाथेरान हिल रेल्वेचाही समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button