
चिपळूण शहरातील बहादूरशेख चौकातील उड्डाण पूल गर्डर बसविण्याच्या कामाला वेग
सध्या आठ पैकी दोन गर्डर वरती चढवून झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी उष्ण पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडल होती. त्यानंतर कामात आवश्यक बदल करून आता पुलाचे बांधकाम अंतिम टप्यात पोहोचले आहे.
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातील बहादूरशेखनाका डॉ. बाबासाहेब आवैद्धकर चौक येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाने आता वेग घेतला असून, पुलाच्या गर्डर बसविण्याच्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. के नच्या सहाय्याने गर्डर पिलरवर बसविण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले.
बहादूरशेख नाका हा मुंबई-गोवा महामार्ग तसेच गुहागर-विजापूर मार्गावरील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असल्याने गर्डर उभारणीदरम्यान काही काळ वाहतुकीत बदल करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात हे काम सुरक्षितपणे सुरु आहे.



