रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्र ४ मधील दुसऱ्या NCMC स्मार्ट कार्ड शिबिराला महिलांनी दिला भरभरून प्रतिसाद

प्रभाग क्रमांक ४ कोकण नगर,किर्तीनगर,नगरपरिषद वसाहत येथे पार पडलेल्या पहिल्या यशस्वी NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिरानंतर तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार रविवार दि :- १९/०७/२०२६ रोजी नगरसेवक श्री केतन शेट्ये व सौ फौजीया मुजावर यांच्यामार्फत दुसऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पुढील काही दिवसांनी एस.टी महामंडळाच्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार असल्यामुळे आणि आपल्याच प्रभागातच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा जागृकता निर्माण झाली,त्यामुळे सदर शिबिराला पहिल्याच शिबिराप्रमाणे महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभागातील सुमारे २७० महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपले स्मार्ट कार्ड काढले तसेच दिनांक ०५/०७/२६ रोजी घेण्यात आलेल्या पहिल्या शिबिरातले स्मार्ट कार्ड यांचे पण वाटप ह्याच शिबिरात करण्यात आले.आजच्या धक्का -धक्कीच्या जीवनात महिलांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून एस.टी स्टँड येथे प्रत्यक्ष जावे लागत आहे तसेच तिथे जाऊन रांगेत तासं तास उभे राहावे लागत आहे कधी कधी जास्ती गर्दी असल्यामुळे काही महिलांना दोन ते तीन वेळा रिकामी परत यावे लागले व त्यामुळे येण्या-जाण्याचा खर्चही वाया जात होता सदर शिबिरामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांचे होणारे त्रास वाचले आणि ही सुविधा प्रभागतच मिळाल्यामुळे खास करून महिलांनी नगरसेवक श्री केतन शेट्ये व सौ.फौजिया मुजावर यांचे खूप आभार मानले. आणि तयार होऊन आलेले स्मार्ट कार्ड प्रभागातच वितरित करण्यात आले त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. नगरसेवक नागरिकांच्या गरजांकडे विशेष लक्ष देतात त्यामुळे त्यांना ते नगरसेवक पेक्षा आपल्याच कुटुंबातील सदस्य आहेत असे नागरिकांना जाणवते. शिबिराचे उत्तम नियोजन व नागरिकांपर्यंत सदर योजनेची माहिती व प्रसार आणि सर्व जबाबदारी योग्यरीत्या पाडणारे श्री.विशाल विकास कदम यांचे विशेष कौतुक एस. टी. विभाग आणि सन्विल एंटरप्रायजेस चे व्यवस्थापक श्री संदीप चव्हाण यांच्याकडून करण्यात आले. शिबिराला यशस्वी करण्यासाठी सौ. मैहरून्निसा साखरकर ,सौ.ऐश्वर्या कदम, कु.वैष्णवी बांडागळे, श्री दिलीप भाटकर या सर्वांची मोलाची साथ लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button