धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सोनम वांगचुक यांची सुटका आणि नुकसान भरपाई; CJP च्या तीन प्रमुख मागण्या


जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या सीजेपीने सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन सादर केले. पक्षाने या निवेदनात तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून तात्काळ सोडण्याची प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

दुसऱ्या मागणीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. नीट-यूजी २०२६ पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तिसरी मागणी करण्यात आली आहे. या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असून, या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलावीत, असे पक्षाने म्हटले आहे.सरकारी प्रतिनिधी आणि आंदोलक यांच्यातील बैठकीनंतर हे निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, चर्चेचा प्रस्ताव आंदोलकांकडून आला असून सकाळी ११:५० पासून चर्चा सुरू होती. नड्डा म्हणाले, बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. सुरुवातीच्या टप्प्यावर आंदोलकांच्या प्रतिनिधी मंडळासोबत सविस्तर तोंडी चर्चा झाली. यानंतर, त्यांनी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मला एक लेखी निवेदन सादर केले, असेही त्यांनी सांगितले. आंदोलन मागे घेण्याचे आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button