इनरव्हील क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न : अध्यक्षपदी सौ. सुवर्णा चौधरी

इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन च्या नविन वर्षाची सुरुवात 1जुलै पासुन झाली. क्लब च्या नियमित सभेत साधेपणाने 2026-27 च्या पदाधिकाऱ्यांना माजी अध्यक्ष्यांं डॉ स्वप्ना करे आणि ऋचा गांधी यांच्या हस्ते पदांची सूत्रे नवीन कार्यकारणीला सोपविण्यात आली.
नविन कार्यकारिणीने जबाबदारी स्विकारत सामाजिक बांधिलकीच्या दिशेने वाटचालीस सुरुवात केली.
इनरव्हील क्लब ही जगातील सर्वात मोठी महिला स्वयंसेवी संस्था आहे मैत्री, समाजातील वंचित आणि गरजू लोकांना मदत ,तसेच जगभरातील संस्कृतींचा आदर करत मानवतावादी कार्यात योगदान देणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
यावेळी अध्यक्ष सौ. सुवर्णा चौधरी, सचिव डॉ. प्रियांका कांबळे, खजिनदार सौ आशा सनगर, आय.एस.ओ.प्रज्ञा गांधी यांनी पदभार स्वीकारत मुले, महिला,वृद्ध यांच्यासाठी तसेच पर्यावरण, आरोग्यविषयक जनजागृती यासाठी उपक्रम घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेत प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button