
विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे ३० जूनपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन
अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना दि. १ जून २०२६ पासून वाढीव वेतन अनुदान लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी २२ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप येणार आहे. शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ३० जूनपासून राज्यातील सुमारे ६५ हजार शिक्षक सामूहिक बेमुदत रजेवर जाऊन थेट आझाद मैदान पाठणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
आंदोलनादरम्यान शिक्षक प्रतिनिधींची शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याम शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान विधानपरिषदेत आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रम काळे सत्यजित तांबे आणि अभिजित वंजारी यांनी वाढीच अनुदानाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरते. सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले असले, तरी २० टक्के अनुदानित शाळांमधील उर्वरित वेतनाची जबाबदारी संबंधित संस्थांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




