आमदार भास्कर जाधव रमले भातलावणीला, शेतीशी असलेली आपली घट्ट नाळ पुन्हा अधोरेखित केली


उबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे राजकीय धावपळीतून वेळ काढत पुन्हा एकदा आपल्या मातीत रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. चिपळूण, तालुक्यातील आपल्या तुरंबव येथील शेतात त्यांनी कुटुंबियांसह पारंपरिक पद्धतीने भातलावणी करत शेतीशी असलेली आपली घट्ट नाळ पुन्हा अधोरेखित केली. शेताच्या चिखलात उतरून प्रत्यक्ष भातलावणी केली, स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतीची मशागत केली आणि दिवसभराच्या श्रमानंतर शेताच्या बांधावरच कुटुंबियांसोबत जेवणाचा आस्वाद घेत ग्रामीण संस्कृतीची जपणूक केली.
राजकारणात प्रभावी वक्ते, अभ्यासू नेते आणि साधी राहाणी उच्च विचारसरणी यासाठी ओळख असलेले भास्कर जाधव दरवर्षी शेतीच्या हंगामात आपल्या शेतात आवर्जून काम करतात. कितीही मोठ्या राजकीय जबाबदार्‍या असल्या तरी शेती आणि शेतकर्‍यांशी असलेले नाते ते कधीही विसरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या कृतीचे स्थानिक नागरिकांसह शेतकरी वर्गाकडून विशेष कौतुक होत आहे. भातलावणी करताना कुटुंबियांनाही त्यांनी श्रमसंस्काराचे महत्त्व पटवून दिले. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत स्वतः ट्रॅक्टर चालविणे आणि पारंपरिक शेतीची जपणूक करणे, या दो होचा सुंदर संगम त्यांच्या कृतीतून पाहायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button