शालेय पोषण आहाराचा तांदूळ जातोय कुठे? पोर्टलवरून माहिती उघड

शालेय पोषण आहाराचा तांदूळ रोज संपून जातो, पण रोज जेवणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र ५० ते ७० टक्केस असते. याबाबतचे वासत्व केंद्र सरकारच्या मीड डे बीलफ पोर्टलवर उघड झाले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शाळांमध्ये हा प्रकार होत असल्याचे पुढे आले आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक शाळांमध्ये पोषण आहार वाटपच होत नसल्याचे पोर्टलवरील आकडेवारी सांगते. तर दुसरीकडे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जेवण देतो, मात्र आकडेवारी भरण्याबाबत विलंब होतो, असा दावा शाळांकडून करण्यात आला आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेंतर्ंगत २८४५ शाळा असून त्यापैकी १९९१ शाळांनीच माहिती मीड डे मीलफ पोर्टलवर भरली आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button