
रत्नागिरीत भरणार ‘भारतीय अभिजात भाषा परिषद’!
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मराठी भाषा विभाग आणि मराठी भाषा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी येथे ‘भारतीय अभिजात भाषा परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
देशातील ११ अभिजात भाषांचे तज्ज्ञ या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. मान्यवर तज्ज्ञांसाठी निवास, भोजन, वाहन आणि सभागृह व्यवस्थेचे नियोजन. तसेच भाषिणी यंत्रणेच्या साहाय्याने विविध भाषांतील संवाद, मजकूर स्वरूपात प्रदर्शित करण्याची डिजिटल व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाहुण्यांना कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, माणदेशी अशा महाराष्ट्राच्या विविध विभागातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद या परिषदेच्या निमित्तानं घेता येणार आहे. या अखिल भारतीय परिषदेच्या उत्तम आयोजनासाठी आज रत्नागिरी येथे पूर्वतयारी बैठक घेतली.




