
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; बाजूला आदित्य ठाकरे तर मागच्या सीटवर संजय राऊत अन् अनिल देसाई!
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला.
मुंबई ते नागपूर असा प्रवास त्यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. या विमानात आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत अनिल देसाई हेदेखील उपस्थित असल्याचं दिसून आलं.
राज्यात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच विमानातून प्रवास करताना दिसून आलं. दरम्यान, ‘आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे’ असं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना म्हणाल्याची माहिती आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याची माहिती आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांचीही चर्चा झाल्याचं दिसून आलं.
2019 पासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय वितृष्ठ आलं आणि दोघांच्या राजकारणाचा मार्ग वेगळा झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठी फूट झाली. लोकसभा निवडणुकीत नऊ खासदार निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फोडले.
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी त्या त्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्याचं निश्चित केल्याचं दिसतंय. 27 जून रोजी उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ वाशिमचा दौरा आहे. त्या निमित्ताने ते नागपूरला जात आहेत. त्याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. त्यामुळे याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
विमानात कोण कोण?
उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई हे नेते उपस्थित होते.




