
चिपळूण पालिकेच्या सभेत गदारोळ, सागर शेडगे यांच्याकडून नगराध्यक्षांची अखेर माफी
चिपळूण येथील नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या मासिक सभेत नगराध्यक्ष उमेश सपकाळ आणि मालमत्ता विभाग अधिकारी सागर शेडगे यांच्यातील पूर्वीच्या वादाचे पडसाद उमटल्याने सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या विषयावर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर सागर शेडगे यांना नगराध्यक्षांची माफी मागावी लागली.
मागील काही दिवसांपूर्वी नगरपालिकेतील खोका वाटप प्रकरणावरून नगराध्यक्ष उमेश सपकाळ आणि मालमत्ता विभाग अधिकारी सागर शेडगे यांच्यात वाद झाला होता. या वादाची तक्रार सागर शेडगे यांनी माध्यमे तसेच राज्यसंघटनेकडे केल्याचा मुद्दा मासिक सभेत पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे यांनी उपस्थित केला. यानंतर शिवसेना गटनेते अंकुश आवले यांनी आक्रमक पवित्रा घेत शेडगे यांनी मीडियासमोर येऊन माफी मागावी शेडगे यांनी नगराध्यक्षांबाबत खोटा अपप्रचार करून त्याची बदनामी केली आहे. नगराध्यक्षांची बदनामी म्हणजे नगरपालिकेची आणि शहराची बदनामी असून हे आम्ही सहन करणार नाही.www.konkantoday.com




