
प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेली तीन वाहने डिझेलला पैसे नसल्याने जागेवरच
पावसाने पाठ फिरवल्याने चिपळूण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना, स्थानिक प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेली तीन वाहने डिझेलअभावी तब्बल आठ दिवसांपासून विश्रामगृहाच्या आवारात धूळ खात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बाजूला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असतानाच दुसर्या बाजूला पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेली वाहने निधीअभावी वापरात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
www.konkantoday.com




