पाचेरी सडा (गुहागर) येथील विकी डिंगणकर आणि सिद्धेश हुमणे यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती

गुहागर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील पाचेरी सडा या गावातील विकी विठ्ठल डिंगणकर आणि सिद्धेश गणपत हुमणे या दोन तरुण मुलांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि मेहनत आणि आई-वडिलांच्या पाठिंब्याने मुंबई पोलीस दलात भरती होऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामुळे पाचेरी सडा गावात ग्रामस्थांनी आणि तरुणांनी एकच जल्लोष केला.
पोलीस भरती ही अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रिया मानली जाते. यामध्ये शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासण्या अशा अनेक टप्प्यांतून उमेदवारांना जावे लागते. पाचेरी सडा गावातील विकी डिंगणकर आणि सिद्धेश हुमणे या दोन तरुणांनी गेल्या अनेक महिन्यांपासून नियमित सराव करत व्यायाम आणि अभ्यास करून स्वतःला या आव्हानासाठी तयार केले. ही तयारी करत असतानाच सकाळी लवकर उठून धावणे, मैदानी सराव याचबरोबर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे असा दिनक्रम कायम चालू ठेवला.
हे दोन्ही तरुण शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना आर्थिक अडचणीनाही सामोरे जावे लागले; मात्र परिस्थिती पुढे हार न मानता त्यांनी उज्वल यश संपादक करत स्वतःला सिद्ध केले. त्यांच्या या यशाबद्दल विकी डिंगणकर आणि सिद्धेश हुमणे ya दोघांवरही पाचेरी सडा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button