विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत खेड तालुका शिवसेनेची बैठक

ग्रामीण भागात प्रथमच तालुका बैठक; विविध गणांतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

खेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबणी-आपेडे फाटा येथील जनार्दन मोरे यांच्या निवासस्थानी खेड तालुका शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीपत्राद्वारे तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
बैठकीच्या प्रारंभी खवटी येथील निष्ठावंत शिवसैनिक कै. लहू गोपाळ सुर्वे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी तालुक्यातील संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला. नेहमी खेड शहरात होणारी तालुका बैठक प्रथमच ग्रामीण भागात आयोजित केल्याबद्दल जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी तालुकाप्रमुख सचिन निकम यांचे कौतुक केले.
यावेळी विक्रांत जाधव यांनी उपस्थित शिवसैनिकांना पक्षसंघटना मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करत त्यांनी आगामी काळात संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
नवनियुक्त भरणे विभागप्रमुख मन्सूर अ. ह. जोगीळकर यांनी भरणे विभागाच्या वतीने जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव व तालुकाप्रमुख सचिन निकम यांचा सत्कार केला.
या बैठकीस युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, तालुकाप्रमुख सचिन निकम, महिला आघाडी तालुका संघटक अंकिता बेलोसे, भरणेचे माजी विभागप्रमुख अंकुश कदम यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
भोस्ते गण : विभागप्रमुख म्हणून संजय आत्माराम निकम, तर उपविभागप्रमुख म्हणून मयुरेश मधुकर आंब्रे यांची नियुक्ती करण्यात आली. कुळवंडी शाखाप्रमुखपदी अनिल विष्णू निकम, जांभूळगाव – प्रतिक दत्ताराम निकम, ऐनवरे – अजित जाधव, माणी – संदिप उतेकर, सवेणी – विकास विचारे, सवेणी मोहल्ला – शफी चिपळूणकर आणि हेदली – अरुण गंगाराम जांभूळकर यांची नियुक्ती झाली.
भरणे विभाग : विभागप्रमुखपदी मन्सूर अ. ह. जोगीळकर, भरणे गण उपविभागप्रमुखपदी लक्ष्मण विठ्ठल भुवड, तर खवटी गण उपविभागप्रमुखपदी गंगाराम जनार्दन दळवी यांची नियुक्ती करण्यात आली.
सुकिवली गण : विभागप्रमुखपदी लक्ष्मण गंगाराम घाग, तर उपविभागप्रमुखपदी नारायण सिताराम खेडेकर व योगेश चंद्रकांत पवार यांची नियुक्ती झाली. तळे शाखाप्रमुखपदी अनिल पर्शुराम मोरे, तळे चिंचवाडी – सुरेश तु. कदम, मांडवे – राकेश सुरेश पवार, कोसमवाडी – तनिष शिवाजी कदम, जैतापूर – चंद्रकांत दौलत सावंत, शिंगरी – शांताराम किसन कदम, पुरे बु. – किसन मनोहर पवार, पुरे खु. – अनंत जयराम महाडीक, किंजळे तर्फे नातू – संजय महादेव गायकवाड, घोगरे – दिलीप विठोबा कडू, दहिवली – संजय बाबू शेलार, घेरारसाळगड – प्रकाश रा. कदम, देवघर – श्रीकांत रामचंद्र मोरे, सोंडे – महेंद्र काशिराम मोरे, कुडोशी – शशिकांत प्र. कदम आणि सुकिवली – अजित सखाराम चाळके यांची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भडगाव गण : उपविभागप्रमुखपदी प्रदीप आत्माराम सकपाळ, तर चाकाळे शाखाप्रमुखपदी संदिप बाळकृष्ण चव्हाण यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करून त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button