आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा


रत्नागिरी – आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी आमदार जठार साहेब यांचाजवळ जिल्हा रुग्णालयातील समस्या मांडल्या. यामध्ये रुग्णायलातील वैद्यकीय 80% पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर आता जिल्हा रुग्णायलातील नर्सेस कमी करत आहेत, नर्सेस नियुक्ती करताना त्यांना CET अनिवार्य नको, GNM केलेल्या विद्यार्थींना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, कंत्राती पद्धतीने विशेष स्टाफ भरती करावा, MBBS डॉ यांची नियुक्ती करावी, भुलतज्ञ, ग्लायकोलॉजिस्ट यांची नेमणूक करावी अश्या विविध मागण्या यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्याजवळ मांडण्यात आल्या. यावर आमदार प्रमोद जठार यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार प्रमोद जठार, डॉ.जयप्रसाद रामानंद, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button