रत्नागिरीत बालहृदयविकाराचे वाढते संकट, दीड वर्षात करण्यात आलेल्या तपासणीत ३४ बालकांना हृदयविकार


बदलती जीवनशैली, जन्मजात दोष, अपुरे पोषण आणि पर्यावरणीय घटकांमुळे लहान मुलांमध्ये हृत्यविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे विताजनक चित्र रत्नागिरी जिल्ह्यात समोर आले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या तपासणीत ३४ बालकांना हृदयविकार असल्याचे निदर्शनास आले असून त्यापैकी २८ बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उर्वरित ६ बालकांवर उपचार आणि शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात केवळ हृदयविकारच नव्हे, तर विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांची तपासणी करण्यात आली. त्यातून २८३ बालकांवर हृद्यविकारासह इतर क्लिष्ट आजारांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेल्या दीड वर्षात एकूण ३८३ मुलांवर यशस्वी उपचार करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या बालकांमध्ये जन्मजात हृदयविकार, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, दुभंगलेले ओठ व टाळू यांसारख्या गंभीर व्याधींचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गर्भधारणेदरम्यान मातेला आवश्यक पोषण न मिळणे, जनुकीय दोष, अनुवांशिकता, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषध, प्रदूषण आणि बदलती जीवनशैली ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांच मत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button