
रत्नागिरी शहरात चोरट्यांनी भरदिवसा घरासह दोन सदनिका फोडल्या
रत्नागिरी शहरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नाचणे सावंतनगर येथे चोरट्यांनी दोन सदनिका देखील फोडून सव्वाचार लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. हेमंतकुमार महेंद्र चोप्रा (५३, रा. नाचणे) यांच्या मालकीच्या घरामध्ये चोरी केली असून विराज विश्वनाथ तोडणकर व आरती स्वप्नील पवार यांच्या सदनिका फोडल्या आहेत. हेमंतकुमार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेमंतकुमार हे ९ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४ च्या दरम्यान घराबाहेर गेले होते. याच कालावधीचा गैरफायदा घेत चोराने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कडीसहित उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील लोखंडी आणि लाकडी कपाटांमधून फिर्यादींच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान साहित्य चोरून नेले. यासोबतच याच परिसरात राहणारे विराज विश्वनाथ तोडणकर आणि आरती स्वप्नील पवार यांच्या फ्लॅटमधूनही सोन्याचे दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केला.www.konkantoday.com




