सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात 29 रुपयांनी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका


महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून आता स्वयंपाकघराचा खर्च वाढणार आहे.सरकारी तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली आहे.

या दरवाढीनंतर देशातील प्रमुख महानगरांमध्ये गॅस सिलेंडरचे दर नव्या पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 942 रुपयांवर गेली आहे. कोलकात्यात ग्राहकांना आता 968 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई आणि पुण्यात सिलेंडरचा दर 941.50 रुपये झाला असून चेन्नईमध्ये तो 957.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढत असताना आता घरगुती गॅसही महागल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण येणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी ही वाढ चिंतेची बाब मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button