संगमेश्वर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी अटकेत


घरच्या एकांताचा
गैरफायदा घेऊन एका ३५ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीशी अश्लील गैरकृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील पोचरी येथे घडली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.मुकेश मोहन देसाई (वय ३५ वर्षे, रा. पोचरी, मधलीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ३६ वर्षीय आईने संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना सोमवार, दिनांक १ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास पोचरी, मधलीवाडी येथील फिर्यादीच्या राहत्या घरात घडली. पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना, आरोपी मुकेश देसाई याने तिच्या एकांताचा गैरफायदा घेतला. पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, आरोपीने वाईट हेतूने अश्लील गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला. याबाबत तिच्या घरच्यांनी फिर्याद दाखल केल्यावर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button