खेड तालुक्यातील खोपी-घोणसरे जंगलात पाय घसरून तरुणाचा मृत्यू


खेड तालुक्यातील खोपी-घोणसरे येथील जंगलमय भागात पाय घसरून पडून ४८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भाऊ सखाराम अवकिरे (रा. खोपी-अवकिरेवाडी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ते घरातून बाहेर पडल्यानंतर जंगलमय भागात पाय घसरून पडले. त्यांचा मृतदेह रविवारी सायंकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button