खेड तालुक्यात गावठी बॉम्बचा स्फोट; १२ वर्षीय मुलगा जखमी


खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे बुधवारी सायंकाळी गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १२ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रणव सुरेश येसरे (वय १२) असे जखमी मुलाचे नाव असून, स्फोटात तो जखमी झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जंगल परिसरात शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या मोठ्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरात शोधमोहीम सुरू केली असून श्वान पथकाच्या मदतीने तपास केला जात आहे. तसेच नागरिकांची चौकशीही सुरू असून स्फोटामागील नेमके कारण आणि गावठी बॉम्ब कोणी ठेवला होता याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button