दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टीत बदल; ६ ऐवजी ९ नोव्हेंबरला सुट्टी


*रत्नागिरी, दि.२६ : जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) रोजी ‘धनत्रयोदशी’ निमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता रद्द करून, त्याऐवजी ९ नोव्हेंबर २०२६ (सोमवार) रोजी ‘दिवाळी’निमित्त स्थानिक सुट्टी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सुधारित अधिकृत आदेश जारी केले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सन २०२६ सालासाठीच्या स्थानिक सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्या यादीतील अनुक्रमांक ३ वर नमूद असलेली ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) ची धनत्रयोदशीची सुट्टी बदलून, आता दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२६ (सोमवार) – दिवाळी निमित्त स्थानिक सुट्टी अशी वाचण्यात यावी, असे या सुधारित आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना आता ९ नोव्हेंबर रोजी दिवाळीची स्थानिक सुट्टी लागू राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button