मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन, मुंबईतील रुग्णालयात सुरू होते उपचार!


ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालय येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने ठाणे शहरासह साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी हे ठाण्यातील समतानगर भागात राहत होते. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालवली होती. शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध ”चळवळ” उभारण्यासाठी त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मोठे कार्य उभे केले.

लेखक, व्याख्याते आणि समुपदेशक म्हणूनही त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. मनोविकार उपचारांसोबतच समुपदेशन, स्व-विकास आणि समाजप्रबोधनासाठी साहित्य, संगीत, नाट्य आणि संवाद यांचा प्रभावी वापर त्यांनी केला. ते पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र चे संस्थापक सदस्यही होते. ”गद्धेपंचविशी” आणि ”विषादयोग” यांसारख्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच रंग माझा वेगळा” आणि ”असेच आम्ही सारे” ही त्यांची व्यावसायिक नाटक ही गाजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button