रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरीचा दहावीचा निकाल ९९.३३ टक्के; वेद डोईफोडे प्रथम


*रत्नागिरी शहरातील रा. ए. सोसायटीचे रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी येथील इयत्ता दहावी (एस.एस.सी.) मार्च २०२६ परीक्षेचा निकाल ९९.३३ टक्के लागला असून शाळेने उज्ज्वल यश संपादन केले आहे.
शाळेतून एकूण २९९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केवळ २ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले आहेत. शाळेचा एकूण निकाल ९९.३३ टक्के इतका लागला आहे. या निकालामध्ये २३३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून २०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ५४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. वेद भगवान डोईफोडे यांनी ४८५ गुण (९७ टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. वेदांत बाबुराव सानये यांनी ४८२ गुण (९६.४० टक्के) मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. कु. प्रांजल प्रकाश नेवरेकर यांनी ४८० गुण (९६ टक्के) मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कु. भूमी ऋषिकेश सावंत यांनी ४७९ गुण (९५.८० टक्के) मिळवत चतुर्थ, तर कु. रूद्र नरेंद्र नलगे यांनी ४७८ गुण (९५.६० टक्के) मिळवत पाचवा क्रमांक मिळविला. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button