रत्नागिरी जवळील आरे-वारे समुद्रकिनारी महाकाय व्हेल माशाचा मृतदेह आढळला


रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आरे-वारे समुद्रकिनारी रविवारी सायंकाळच्या सुमारास एक महाकाय व्हेल मासा मृत अवस्थेत आढळून आला.समुद्रकिनारपट्टीवर एवढ्या मोठ्या आकाराचा मासा मृतावस्थेत तरंगताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी फिरायला आलेल्या पर्यटकांना समुद्राच्या लाटांसोबत एक मोठी वस्तू किनाऱ्याकडे सरकताना दिसली. जवळ जाऊन पाहिल्यास तो एक महाकाय व्हेल मासा असल्याचे स्पष्ट झाले. हा मासा काजिरभाटी किनाऱ्याजवळ लाटांच्या प्रवाहाने वाहत आला होता. ही बातमी समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी मासा पाहण्यासाठी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button