मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 प्रमाणे दापोली-खेड वाहतूक वळविणे अधिसूचना


रत्नागिरी, दि. ८ कार्यकारी अभियंता, सावर्जनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांनी खेड-दापोली रस्ता (राज्य महामार्ग 162) चे सुधारणेचे काम ‘हॅम’ (HAM) योजनेअंतर्गत प्रगतीपथावर आहे. सदर कामाच्या अनुषंगान साखळी क्रमांक 0/300 येथे स्लॅब ड्रेन/पुलाच्या पुनर्रचनेचे काम प्रस्तावित आहे. सदर काम सुरक्षितपणे व विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येत आहे. याकरिता अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 प्रमाणे आदेश दिले आहेत.*
दापोली-खेड वाहतूक वळविणे (दोन्ही बाजूने): साखळी क्रमांक 0/300 येथील पुलाच्या कामासाठी सध्याची 12 मीटर उपलब्ध रुंदी अपुरी असल्याने, 3 महिन्यांच्या कालावधीसाठी वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे:
सध्याचा मार्गः दापोली खेड (थेट राज्य मार्ग क्र. 162).
प्रस्तावित वळण मार्ग:- दापोली खेड पिसई पालगड फाटा राज्य मार्ग क्र. 101 खेड (दोन्ही दिशेने).
प्रवासाचे अंतरः सध्याचे अंतर साधारण 30 किमी असून, वळण मार्गानुसार साधारण 38 किमी राहील. (अतिरिक्त अंतर अंदाजे 8.00 कि.मी.)
बॉक्साईट वाहनांची अवजड वाहतूक वळविणेः मंडणगड तालुक्यातील बॉक्साईट खाणीतून येणारी अवजड वाहने सध्या राज्य मार्ग क्र. 101 आणि राज्य मार्ग क्र. 162 वरून दस्तुरी फाटा ते भरणा नाका मार्गे खेड शहरातून जातात. खेड शहरातील लांबीत विषयांकित काम सुरू असल्याने बॉक्साईटची वाहतुक करणाऱ्या मोठ्या प्रमाणातील अवजड वाहनांमुळे खेड शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे बॉक्साईट वाहने खालीलप्रमाणे वळविण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
सध्याचा मार्गः बॉक्साईट खाण मंडणगड राज्य मार्ग क्र. 101 दस्तुरी फाटा- खेड शहर भरणा नाका.
प्रस्तावित वळण मार्गः बॉक्साईट खाण मंडणगड ते विसापूर फाटा (नेहमीप्रमाणे) – पुढे राज्य मार्ग क्र. 97 (लाटवण – रेवतळे फाटा) राज्य मार्ग क्र. 172 (नातुनगर तुळशी विन्हेरे भोगाव) आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (मुंबई-गोवा) वरून ‘भरणा नाका.
प्रवासाचे अंतरः सध्याचे अंतर साधारण 50 किमी (खाण ते भरणा नाका) असून, प्रस्तावित वळण मार्ग हा साधारण 70 किमी अंतराचा राहील. (अतिरिक्त अंतर अंदाजे 20.00 कि.मी.)
सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून सवलतधारकामार्फत वळण मार्गावर आवश्यक ते सर्व दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करारनाम्यातील अटींनुसार करण्यात येणार आहे.
वाहतुकीची कोंडी टाळणेकरीता व कोणताही अनुचित प्रकार घड्डु नये या करिता वरील प्रमाणे वाहतुक वळविणेत यावी. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घड्डु नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतुक नियमनाबाबत जनतेला माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावी असे आदेशित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button