
गुहागर ब्ल्यू फ्लॅग अंतिम आराखडा मंजूर
गुहागरच्या पर्यटनामधील महत्त्वकांक्षी प्रकल्प ठरलेल्या गुहागर ब्ल्यू फ्लॅग आराखड्याला पर्यटन विभागाने अंतिम मंजुरी दिली आहे. तर आराखड्यानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशामध्ये कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेली भेट महत्वपूर्ण ठरली असून ब्ल्यू फ्लॅगचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत त्याचबरीवर शहराची स्वच्छता वैगुला मॉडेलच्या धनीवर कली जाणार असून यासाठी कल्याण डोंबिवली उपायुक्त रामदास कोकार मार्गदर्शन करणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व दापोलीतील लाडघर बीचवरील ब्ल्यू फ्लॅग प्रकल्प साकारण्याच्या कामाला गती| निर्माण झाली आहे. सदर उभारणी प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याअगोदर गुहागर समुद्रकिनारा ब्ल्यू फ्लॅगचे काम जलदगतीने होण्यासाठी अत्यंत सोयीचा ठरला असून या प्रकल्पाच्या उभारणीचा अंतिम लेआऊट मंजूर करण्यात आला आहे.www.konkantoday.com




