
चिपळूणमध्ये आ. निलेश राणे विरुद्ध कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा ’राजकीय शिमगा’ रंगला
चिपळूण आमदार निलेश राणे काल चिपळूणमध्ये पक्षप्रवेशा करता आले असता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की प्रदेशाध्यक्ष हे टिपू सुलतानाचे अवलाद आहेत. त्यांना आमच्या महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दलचे शब्द त्याच्या तोंडात शोभत नाहीत. मी स्वतः तीस एकर जमीन संपादित करण्याच्या सूचना केल्या आहेत व ५०० कोटीचा निधी देखील मागितला आहे. मात्र त्या ठिकाणी भव्य-दिव्य स्मारक उभारण्याचा विचार असल्याने अधिक जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे अतिरिक्त कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या कार्यकत्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्य शाळेसाठी आलेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील पत्रकार परिषेदेत आमदार निलेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
कोकण दौर्यात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी कैद करण्यात आले त्या संगमेश्वर परिसरातील कसबा येथील ऐतिहासिक स्थळाला भेट दिली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी सांगितले की, संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि त्या जागेची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. स्मारक उभारणीबाबत राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, हे स्मारक पूर्ण झाल्यास त्या ठिकाणच्या इतिहासातील अनेक गोष्टी पुढे येतील, याची भीती सरकारला वाटते का? त्यामुळेच स्मारकाच्या कामाला विलंब होल असल्याची शंक्का त्यांनी व्यक्त केली.
जमीन संपादनासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या सुरू असलेच्या युद्धासंदर्भात त्यांनी सांगितले की, तेथील भारतीयांना टोल फ्री नंबर देण्यात आले आहेत व ते सर्वत्र पोहोचले आहेत त्यामुळे सरकार त्यांची काळजी घेत आहे. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबतही भाष्य केले. या महामार्गाच्या कामाबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत असून राज्यस्तरीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com




