
कुसुमताई पतसंस्थेत साडेतीन कोटी ठेवी ग्राहकांचा प्रतिसाद ; १ ऑगस्टपर्यंत ठेववृद्धी मासाची मुदत
कुसुमताई सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, २० दिवसात ३ कोटी ५० लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ९ टक्के दराला सर्वाधिक पसंती मिळत असल्याची माहिती पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी दिली.
पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासामध्ये ५ कोटी ठेवी संकलीत करण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला ते लक्ष्य जवळजवळ पूर्णत्वास येत आहे. पतसंस्थेवरील ग्राहकांचा विश्वास वाढत असल्याचे ठेववृध्दी मासाला मिळालेल्या प्रतिसादातून दिसत आहे. पतसंस्थेत येणारा ग्राहक हा विविध गटातील आहे. पतसंस्थेने या योजनेत १ वर्षासाठी ९ टक्के व्याजदर व ३ वर्ष मासिक, त्रैमासिक व्याज ८ टक्के व ३ वर्ष पुनर्गुतवणूक ठेव व्याजदर ७.५० टक्के ठेवीदारांसाठी ठेवलेले आहेत. संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या ठेववृद्धी मासात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, संस्थेकडे ५० कोटीच्या ठेवी आज पर्यंत जमा झालेल्या आहेत.
यंदा ठेववृद्धी मासात ७५ कोटीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी सर्व संचालक, कर्मचारी, पिग्मी एजंट यांनी नियोजन केले आहे. पहिल्या आठ दिवसात २ कोटी तर त्यानंतर बारा दिवसात दीड कोटी अशा साडेतीन कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ठेव मासासाठी १ ऑगस्ट पर्यंत मुदत असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रा. नाना शिंदे व उपाध्यक्ष श्री. शेवडे यांनी केले आहे.




