
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्च घोषणा देणार्यांवर कारवाई करा
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अर्वाच्च शब्दात व्यक्तव्य करणार्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी चिपळूण भाजप शहर मंडळ यांच्यावतीने काल शुक्रवारी चिपळूण पोलीस स्थानकात सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की नरेंद्र मोदी यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद घोषणा देऊन चुकीच्या पद्धतीने त्या व्यक्त करून त्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या अयान मिठागरी याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्याने अशीच धार्मिक तेढ यापूर्वी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहितीही शिष्टमंडळाने पोलिसांना दिली. अयान मिठागरी याच्यावर पुढील आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास किंवा त्याला योग्य ते शासन न झाल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्या निवेदनात शेवटी नमूद करण्यात आलेले आहे.



